१० ऑक्टोबर रोजी ठाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा
ठाणे : संविधानिक आरक्षणातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा,अनुसूचित जातीच्या २०११ च्या जनगणनेनुसार १८ टक्के तर २०२१ नुसार २० टक्के आरक्षण लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी येत्या १० ऑक्टोबर रोजी ठाणे रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा असा विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा नंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जाहीर सभा होणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत अनुसुचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी दिली.यावेळी पत्रकार परिषदेला केंद्रीय सदस्य प्रा. जगन्नाथ बावा, आबासाहेब चासकर, सुखदेव उबाळे, बाळासाहेब ओव्हाळ, अलका जगताप, आनंद नवसागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यात अ ब क ड अशी जातीची विभागणी करून एससी समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाचा हा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भीम योद्धा संघर्षास सज्ज झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यासाठी बैठका झाल्या असल्याची माहिती पंढरीनाथ गायकवाड यांनी दिली.
सरसेनापती आनंदराज आंबेडकर, डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. सुरेश माने, माजी मंत्री बबनराव घोलप, राजकुमार बडोले, माजी आमदार बाबुराव माने, संजय खामकर, शरदचंद्र जाधव आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. अनुसूचित जाती मधील संपूर्ण ५९ जाती या उपवर्गीकरण विरोधात एकवटल्या असून लाखोंच्या संख्येने अनुयायी या मोर्चात सहभागी होणार असल्याचे पंढरीनाथ गायकवाड यांनी सांगितले.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
२० वर्षांपासून एसआरएमधील नागरिक घराच्या प्रतिक्षेत
10 Sep 2026
भूमी एकर्सचा "भूमी महाघोटाळा" ; शासनाची फसवणूक करून गोरगरीबांची घरे लाटली
09 Sep 2026
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मेजर डॉ. नितिन राठोड
08 Sep 2026
ठाण्यात बंजारा समाजाच्या भव्य तीज महोत्सवाची धूम
08 Sep 2026