काॅक्रोच आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या
ठाण्यात रिपाइं आठवले गटाचे आंदोलन , अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण निर्णय रद्द करा
ठाणे : नवी दिल्ली येथील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, उपवर्गीकरण रद्द करून पूर्ववत आरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
अनुसूचित जातींच्या एकीसाठी आरक्षणातील उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) याचा निर्णय रद्द करण्यात यावा, विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावे, दिल्ली येथे विद्यार्थिनी व महिलांवर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने त्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावे, नीट पेपरमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक करोडची भरपाई देण्यात यावे, राष्ट्रीय पातळीवरील नीट परीक्षा रद्द करावी या मागण्यांसाठी रिपाइंचे ठाणे जिल्हाध्यक्ष अण्णा रोकडे , ठाणे अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून अभिजीत दीपके यांचे अभिनंदन केले.
या आंदोलनात सुरेश बारशिंगे, अण्णा रोकडे, महेश खरे, देवेंद्र शेलेकर, संजय गायकवाड, प्रल्हाद मगरे, प्रमोद इंगळे, तात्याराव झेंडे, विनोद भालेराव , बबन केदारे, मोहन गमरे , विमल सातपुते कविता भोसले, उषा काटे , बाली ठाकूर, अनिता मनोरे , सुरेश केदारे , अनिल रावतळे आदी सहभागी झाले होते.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषण.
संबंधित बातम्या
ठाणे जिल्ह्यात प्रथमच आयोजित 'मिनी लोकअदालत' यशस्वी
27 Jul 2026
नळपाड्याच्या पुनःर्वसनासाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची एसआरए कार्यालयावर धडक
27 Jul 2026
आमदार संजय केळकर यांच्या 'देवाभाऊ चष्मा' वाटप उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
27 Jul 2026
ड्रायव्हर नव्हे, भागीदार बना'; 'नमो सहकार टॅक्सी' योजनेतून चालकांना मालकी हक्क
27 Jul 2026