ठाण्यातील बंजारा समाजाच्यावतीने तीज महोत्सवाचे आयोजन
ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात प्रत्येकवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील बंजारा समाजाच्यावतीने भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाजाची संस्कृती आपल्या भावी पिढीला कळावी म्हणून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या पवित्र तीजचे रोपण शनिवारी करण्यात आले असून येत्या 6 सप्टेंबर 2026 रोजी विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन म्हणजेच रविवार 6 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या संस्कृतीवर आधारित गाणी, नृत्य तरुणींकडून सादर करण्यात येणार असल्याचे आयोजक तसेच नायक संजय राठोड यावेळी म्हणाले. हे कार्यक्रम ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गणपती मंदिर,डोंगरीपाडा येथे होणार असल्याचे कारभारी रमेश जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि ठाण्यातील बंजारा समाजाला या भव्य कार्यक्रमात सामील होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती समाजसेवक नारायण आडे यांनी दिली. या कार्यक्रमात बंजारा समाजाचे लोकप्रतिनिधी,अधिकारी, डॉक्टर, राजकीय नेते, महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती नायक संजय राठोड यांनी यावेळी दिली.#newsdisha #thane #thanekar #ठाणे #banjara #तिज
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
१० ऑक्टोबर रोजी ठाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा
07 Oct 2026
२० वर्षांपासून एसआरएमधील नागरिक घराच्या प्रतिक्षेत
10 Sep 2026
भूमी एकर्सचा "भूमी महाघोटाळा" ; शासनाची फसवणूक करून गोरगरीबांची घरे लाटली
09 Sep 2026
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मेजर डॉ. नितिन राठोड
08 Sep 2026