आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
अनुसूचित जमातींच्या सोयी-सवलतींबाबत समितीची पहिली बैठक !
मुंबई : अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतर केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलतींबाबत महाराष्ट्रासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक आज मुंबईतील मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महत्वपूर्ण बैठकीस राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते.
या बैठकीत केंद्र शासन तसेच इतर राज्य शासनांनी यासंदर्भात केलेले कायदे, नियम आणि धोरणांचा सखोल अभ्यास करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच या विषयाशी संबंधित सर्व कायदेशीर, सामाजिक आणि प्रशासकीय बाबींचा विचार करून महाराष्ट्रासाठी योग्य आणि सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने नेमलेल्या समितीच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली.या विषयाचे गांभीर्य आणि त्याचा अनुसूचित जमातीतील नागरिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सर्व उपलब्ध माहितीचा अभ्यास, संबंधित घटकांचे म्हणणे आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन वस्तुनिष्ठ पद्धतीने पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
16 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026
सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज
15 Sep 2026