'धर्मवीर चषक २०२६' पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ!
मुंबई : खेरनगर, वांद्रे (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित 'धर्मवीर चषक २०२६' पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार शुभारंभ संपन्न झाला. युवकांमध्ये क्रीडाभाव, शिस्त, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवसेना विभाग क्र. ७ चे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेत अनेक नामांकित संघ सहभागी झाले असून, प्रथम पारितोषिक ₹३ लाख व द्वितीय पारितोषिक ₹२ लाख तसेच धर्मवीर चषक प्रदान करण्यात येणार आहे. पावसाळी वातावरणात रंगणाऱ्या या स्पर्धेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
16 Sep 2026
आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
15 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026