घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
मुंबई : कुर्ला येथील डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात घरच्या प्रसूतीनंतर दाखल झालेल्या माता व नवजात बाळाची मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली.यावेळी हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचीही विचारपूस केली.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित २२ वर्षीय महिलेची प्रसूती आज, ९ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजता घरी झाली. तिने एका मुलाला जन्म दिला असून बाळाचे वजन सुमारे २.४ किलो आहे. मात्र प्रसूतीनंतर नाळ बाहेर न आल्याने नातेवाईकांनी तिला तातडीने डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात आणले.
रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने आवश्यक उपचार सुरू केले. ड्युटीवरील स्टाफ नर्सने बाळाची नाळ कापली, तर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी पहाटे सुमारे ५.१० वाजता आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करून वार बाहेर काढली.सध्या माता आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही प्रसूतीनंतरची गुंतागुंत आढळलेली नाही.
यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून रुग्णाच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली. माता आणि बाळ दोघांचीही योग्य काळजी घेतली जात असल्याची खात्री करून घेत, आवश्यक वैद्यकीय उपचार व निरीक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
16 Sep 2026
आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
15 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026