कोकणात परप्रांतीय राजा होतोय : अभिनेते वैभव मांगले
मुंबई : कोकणातील शेती, मासेमारी, आंबे, काजू बागामध्ये काम करण्यासाठी बिहार, युपी आणि नेपाळमधून मोठ्याप्रमाणात परप्रांतीय येत असून ते नसले तर हे सर्व कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात आता हे परप्रांतीय राजा झाल्याचे चित्र अनेक तालुक्यांमध्ये आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांनी लवकरच बिहारी आणि उर्दू भाषा शिकण्याची तयारी ठेवा असे धक्कादायक विधान मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी केले आहे.
कोकणातील मराठी माणूस नोकरीच्या शोधात मुंबईत येत आहे आणि मुंबईत दहा ते पंधरा हजार रुपयाची नोकरी करत आहे. कोकणी माणसाला आपल्या गावात रोजगाराच्या संधी दिसत नाही मात्र याच कोकणात बिहार, कर्नाटक, युपी आणि नेपाळमधील तरुण मोठ्याप्रमाणात येत आहेत आणि छोटेमोठे व्यवसाय करून रोज दोन ते पाच हजार रुपये कमावत आहे. मात्र आपला कोकणी माणूस मुंबईत महिन्याला पंधरा हजार रुपये कमावत आहे आणि त्यात तो समाधानी आहे. हे परप्रांतीय कायम राहावे म्हणून येथील स्थानिक कोकणी माणूस प्रार्थना करत आहे. हे परप्रांतीय जर कोकण सोडून गेले तर संपूर्ण कोकणातील कामे ठप्प होण्याची शक्यता आहे.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
16 Sep 2026
आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
15 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026