तुकाराम मुंढेंचा मोर्चा शाळांकडे, महिन्यातून दोनवेळा तपासणी
शाळा आवारात चॉकलेट, ब्रेड, पान मसाला दुकानांवर बंदी, ‘ईट राइट स्कूल’ची अंमलबजावणी कडक
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्यापासून हॉटेल मालकांचे आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात एफडीएने अनेक मिठाई तयार करणाऱ्या दुकानांवर, हॉटेल्सवर आणि दूध उत्पादकांवर धाड टाकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील अनेक प्रसिद्ध दुकानांवरही कारवाई करत एफडीएने त्यांचे परवानेही रद्द केले आहेत. यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा शाळांकडे वळवला असून अन्न व औषध प्रशासनाने बनवलेल्या नव्या नियमावलीची माहिती दिली आहे.
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलत नवीन नियमावली बनवली आहे. यानुसार, शाळेच्या 50 मीटरच्या परिसरात असणारी दुकाने, स्टॉल्स आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांना ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे’ (FSSAI) सर्व नियम यापुढे पाळावे लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना लठ्ठपणा आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी जंक फूड आणि उच्च चरबीयुक्त पदार्थांच्या विक्रीवर रोख लावली जाणार आहे.
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, राज्यात जवळपास दोन कोटी विद्यार्थी शासकीय व इतर शाळांमध्ये शिक्षण घेतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांना हे नियम लागू असतील. तसेच 22 महिन्यांच्या बालकांपासून ते 12 वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या आहाराच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी शाळांमधील कँटीन, वसतिगृह आणि अंगणवाड्यांमध्ये अन्न पुरवण्यासाठी अन्न परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विनापरवाना अन्न पुरवठ्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्ये आणि पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला असून, शाळांना आहाराची ‘आदर्श केंद्रे’ बनवण्यासाठी ‘ईट राइट स्कूल’ संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे.
शाळेत ‘फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड’ लावणे बंधनकारक
प्रत्येक शाळेत नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी ‘फूड सेफ्टी सुपरवायझर’ आणि ‘नोडल अधिकारी’ यांची नियुक्ती करणार.प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोनदा अन्न सुरक्षा तपासणी केली जाईल आणि तसेच अन्नाचा एक नमुना चाचणीसाठी घेतला जाईल.प्रत्येक शाळेमध्ये पिण्यायोग्य शुद्ध पाणी आणि स्वच्छता राखणे अनिवार्य राहील.या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर असेल.शालेय आहाराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आणि पुरवठादारांवर कडक कारवाई करून त्यांना दंड ठोठावणार.शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांची या मोहिमेत मदत घेतली जाणार.
शाळा परिसरात केक, चॉकलेट दुकानांवर बंदी
IAS Tukaram Mundhe : शाळेच्या आवारात चॉकलेट, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्सवर बंदी, तुकाराम मुंढे यांचा मोठा आदेश, IAS तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता शाळेतील कॅन्टीनबाबत तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शाळेच्या आवारात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
16 Sep 2026
आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
15 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026